विशेष दालने व सुविधा
आभासी चित्रीकरण कक्ष (क्रोमा स्टुडिओ)
सदर दालन हे ग्रीन स्क्रीन व्हिडिओ शुटिंगसाठी भाडेतत्वावर दिले जाते.
आसनक्षमता | 30 खुर्च्या |
---|---|
क्षेत्रफळ – रंगमंच | एकूण: ९६१ चौ.फू., लांबी: ३१ फूट, रुंदी: ३१, उंची: 8.५ फूट |
स्थळ | तिसरा मजला, प्रशासकीय इमारत |
उपलब्ध सुविधा
- एसी, एकॉस्टिक, २७० डिग्री वाईड अँगल व एडजस्टेबल लाईट्स, लेक्सा लाईट्स सिस्टीम (कंट्रोल व मोनिटरिंग सिस्टीम सह), स्वतंत्र पिक्चर कंट्रोल रूम, ६ कॅमेरा स्विचर, लाईव्ह स्ट्रिमिंग, लिलीपूट, ब्रॉडकास्टर, साऊंड उपकरणे, टॉकबॅक, सोनी अल्फा ए ७ ४ के (लेन्ससह),१७ इंच टेलिप्राँप्टर सिस्टीम आणि मेकअप.
दालनातील भिंतीवर व कार्पेटवर कोणत्याही पद्धतीचे डाग लागणार नाही याची काळजी घ्यावी.
- अकादमी संकुलात उपलब्ध असलेली पार्किंग ही संकुलातील सर्व सुविधांसाठी असल्यामुळे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर वापरली जाते. कृपया संस्थेने याची नोंद घ्यावी व पार्किंग पूर्ण भरल्यास पार्किंग बंद करण्यात आल्यावर संस्थेकडून किंवा प्रेक्षकांकडून सुरक्षारक्षकांना कोणत्याही पद्धतीचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.
- आपण केलेल्या सुविधेच्या आरक्षण वेळेच्या आतच आपणास कार्यक्रमाची तयारी करणे, कार्यक्रमाचे सादरीकरण करणे व कार्यक्रमाचे सामान नाट्यगृह/दालनाच्या बाहेर काढणे सामाविष्ठ आहे. कृपया याची नोंद घ्यावी व काटेकोरपणे पालन करावे. कार्यक्रमानंतर दूसरा कार्यक्रम असल्यास व आपली आरक्षित वेळ संपली असल्यास नाईलाजास्तव आपला कार्यक्रम मधेच थांबवला जाऊ शकतो. त्यामुळे कार्यक्रम संस्थेने आरक्षित वेळेतच आपला कार्यक्रम संपून सर्व सामान नाट्यगृहाबाहेर जाईल असे व्यवस्थापन ठेवावे.
- नाट्यगृहामध्ये रंगमंच व प्रेक्षागृहात तसेच इतर दालनांमध्ये कोणत्याही पद्धतीचे खाण्याचे व पिण्याचे पदार्थ नेऊ नये व याबाबत कार्यक्रमास आलेल्या प्रेक्षकांनाही कळवावे. खानापानाच्या गोष्टी द्वारपालांकडून अडविण्यात आल्यास कृपया त्यांना सहकार्य करावे.
- अकादमी संकुलामध्ये कोणत्याही पद्धतीचे व्यसन करू नये. तसे करताना आढळल्यास सदर कार्यक्रमाच्या संस्थेवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. तरी कृपया संस्थेने याची नोंद घ्यावी.