रवींद्र नाट्यमंदिर हे नाट्यगृह कलेचे एक नामांकित केंद्र आहे. रवींद्र नाट्यमंदिरामध्ये संगीत, नाटक व नृत्य या रंगमंचीय कलांकरिता उत्तम सोयी सुविधा उपलब्ध आहेत. आकर्षक अंतर्गत सजावट, आरामदायक आसन व्यवस्था, आधुनिक तिकीट विक्री केंद्र, कलाकारांसाठीचे सुसज्ज रंगपट, भव्य रंगमंच, अत्याधुनिक ध्वनी आणि प्रकाशव्यवस्था, एलईडी स्क्रीन, चित्रपट प्रदर्शनासाठी स्वतंत्र पडदा, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी देखणा कक्ष यांची सोय आहे. नूतनीकृत रवींद्र नाट्य मंदिरामध्ये एकावेळी 881 प्रेक्षक कलेचा आनंद घेऊ शकतात.
आसनक्षमता | 893 |
---|---|
क्षेत्रफळ – रंगमंच | 48 फूट x 42 फूट (पिट वापरल्यास 37 फूट) |
स्थळ | तळ मजला, रवींद्र नाट्यमंदिर इमारत |
रवींद्र नाट्यमंदिर येथे कार्यक्रमाच्या भाडेरक्कमेमध्ये ०३ फूट माईक, ०५ हँगिंग माईक, ०१ स्टँड माईक, 01 पोडिअम, ०४ लेव्हल, ०४ मोढे, ४ जनरल लाईट्स, १० एल.ई.डी स्पॉट लाईट व १५ किलोवॅटपर्यंत विजवापर यांचा मोफत सामावेश आहे.
अतिथी कक्ष वापरायचा असल्यास तसे प्रशासनास कळवावे. अतिथी कक्ष अतिथी येण्याच्या आर्धा तास आधी उघडण्यात येईल.