खुला रंगमंच + कलांगण
अकादमीत येणाऱ्या कलाकारांकरिता कलांगण मुक्त नाट्यगृह आणि नाट्यपटांगण यांची गरज पूर्ण करते. कलांगणामध्ये असणारे सुमारे ८० प्रेक्षकांकरिता तयार केलेले खुले नाट्यगृह प्रायोगिक कलाविष्कार तसेच अकादमीच्या 'पुल कट्टा' सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून कलाकारांना मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. कलांगणाच्या विस्तीर्ण रंगमंचाचा उभय बाजूने वापर करता येतो. अकादमीच्या प्रांगणातील या मोकळ्या जागेत प्रदर्शने, खुल्या जागेतील पुरस्कार सोहळे, स्नेहमेळावे आणि तसेच शास्त्रीय संगीताच्या मैफिली व लोककलेचे कार्यक्रम यांकरिता वापर करता येऊ शकतो. सुमारे 400 लोकांची बसण्याची व्यवस्था या प्रांगणात होते. कलांगण हे खऱ्या अर्थाने कलाकारांचे असून, येथे सृजनात्मक कलांच्या चिंतन ते सादरीकरण या प्रवासाचा अनुभव घेता येतो.
| आसनक्षमता | 80 + 400 |
|---|---|
| खुला रंगमंच/कलांगण रंगमंच | रुंदी: १७ फूट व लांबी: ४० फूट |
| कलांगण मैदान | रुंदी: ६५ फूट व लांबी: ८० फूट |
| मजला | तळ मजला, प्रशासकीय इमारत |
खुल्या रंगमंचावर/ कलांगणात कार्यक्रम सादर करताना संस्थेने साऊंड सिस्टीमचा आसपासच्या रहिवास्यांना त्रास होणार नाही व शासनमान्य आवाजाच्या पातळीच्या आतच आवाज राहील याची दक्षता घ्यावी. याबाबत पोलिस प्रशासनाकडून काही परवानगी लागत असल्यास किंवा पोलिस प्रशासनाने कोणताही आक्षेप घेतल्यास त्याबाबतची संपूर्ण जबाबदारी ही संस्थेची राहील.
- अकादमी संकुलात उपलब्ध असलेली पार्किंग ही संकुलातील सर्व सुविधांसाठी असल्यामुळे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर वापरली जाते. कृपया संस्थेने याची नोंद घ्यावी व पार्किंग पूर्ण भरल्यास पार्किंग बंद करण्यात आल्यावर संस्थेकडून किंवा प्रेक्षकांकडून सुरक्षारक्षकांना कोणत्याही पद्धतीचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.
- आपण केलेल्या सुविधेच्या आरक्षण वेळेच्या आतच आपणास कार्यक्रमाची तयारी करणे, कार्यक्रमाचे सादरीकरण करणे व कार्यक्रमाचे सामान नाट्यगृह/दालनाच्या बाहेर काढणे सामाविष्ठ आहे. कृपया याची नोंद घ्यावी व काटेकोरपणे पालन करावे. कार्यक्रमानंतर दूसरा कार्यक्रम असल्यास व आपली आरक्षित वेळ संपली असल्यास नाईलाजास्तव आपला कार्यक्रम मधेच थांबवला जाऊ शकतो. त्यामुळे कार्यक्रम संस्थेने आरक्षित वेळेतच आपला कार्यक्रम संपून सर्व सामान नाट्यगृहाबाहेर जाईल असे व्यवस्थापन ठेवावे.
- नाट्यगृहामध्ये रंगमंच व प्रेक्षागृहात तसेच इतर दालनांमध्ये कोणत्याही पद्धतीचे खाण्याचे व पिण्याचे पदार्थ नेऊ नये व याबाबत कार्यक्रमास आलेल्या प्रेक्षकांनाही कळवावे. खानापानाच्या गोष्टी द्वारपालांकडून अडविण्यात आल्यास कृपया त्यांना सहकार्य करावे.
- अकादमी संकुलामध्ये कोणत्याही पद्धतीचे व्यसन करू नये. तसे करताना आढळल्यास सदर कार्यक्रमाच्या संस्थेवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. तरी कृपया संस्थेने याची नोंद घ्यावी.
