अकादमी संकुलातील तिसऱ्या मजल्यावरील लघु नाट्यगृह संपूर्णपणे नवीन आणि आकर्षक करण्यात आले आहे. ४के दर्जाच्या प्रक्षेपणाची व्यवस्था आणि डॉल्बी ऍटमॉस ही अत्याधुनिक ध्वनि यंत्रणा ही या लघुनाट्यगृहाची खास ओळख आहे. छोटेखानी कार्यक्रम, मैफली, नाटके आणि प्रायोगिक रंगभूमीसाठी हे एक उपयुक्त नाट्यगृह आहे. सुसज्ज व आधुनिक रंगपट, सी आकाराचा रंगमंच, उत्तम आसन व्यवस्था, स्वतंत्र तिकीट विक्री केंद्र, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी कक्ष आणि आधुनिक प्रकाश आणि ध्वनी व्यवस्था यांनी हे लघु नाट्यगृह सुसज्ज आहे. याची आसनक्षमता १८५ आहे.
आसनक्षमता | 185 |
---|---|
क्षेत्रफळ – रंगमंच | लांबी २७ फूट व रुंदी १९ फूट |
मजला | तिसरा मजला, प्रशासकीय इमारत |
लघु नाट्यगृह येथे कार्यक्रमाच्या भाडेरक्कमेमध्ये 01 पोडिअम, ०२ लेव्हल, ०२ मोढे, ०२ जनरल लाईट्स, ०६ एल.ई.डी स्पॉट लाईट्स व ०१ स्टँड माईक यांचा सामावेश आहे.
लघु नाट्यगृहाबाहेरील अतिथी कक्ष हे दालन लघु नाट्यगृहाच्या आरक्षणात उपलब्ध होत नाही.
सदर अतिथी कक्ष हवा असल्यास स्वतंत्र आरक्षित करावा.